तबस्सूम!
अभिनेत्री अन्
उत्कृष्ट निवेदिका 

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम गोविल याचं निधन झालं. 

तबस्सूम यांनी अनेक वर्ष निवेदिका म्हणून काम केलं. 

दूरदर्शनच्या काळातील 'फूले खिले हैं गुलशन गुलशन' या सेलिब्रेटी टॉक शोच्या होस्ट म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. 

तबस्सूम टॉकिज असं त्यांचं युट्यूब चॅनेल आहे. 

निवेदनाची त्यांची अनोख्या स्टाइलसाठी त्या प्रसिद्ध होत्या. 

तबस्सूम नव्या प्रोजेक्टचं शुटींग करत असताना त्यांची तब्येत खालावली. 

रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. 

तबस्सूम यांनी ‘नर्गिस’ सिनेमातून बालकलाकार म्हणून काम सुरू केलं. 

तबस्सूम या प्रचंड मेहनती होत्या. व्हिल चेअरवर बसून त्या शो होस्ट करायच्या. 

हिर रांझा, गॅम्बलर, जानी मेरा नाम, तेरे मेरे सपने सारख्या सिनेमात त्यांनी काम केलं आहे. 

तबस्सूम यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.