का रे दुरावा मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सुयश टिळक

सुयश बायको आयुषीबरोबर वैवाहिक आयुष्य सुखात घालवतोय. 

दरम्यान सुयशच्या लग्नाआधीच्या ब्रेकअपची पुन्हा चर्चा होतेय. 

सुयश अभिनेत्री अक्षया देवधरबरोबर रिलेशनमध्ये होता. काही वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. 

अचानक त्यांचा ब्रेकअप झाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. 

ब्रेकअपनंतर सुयशची काय अवस्था झाली होती हे त्याने एका मुलाखतीत सांगितलं. 

सुयश म्हणाला,"मी ते स्वीकारू शकत नव्हतो. माझी मानसिक स्थिती डिस्टर्ब होती". 

"त्यावेळी मी वेडे चाळे केले. मी तेव्हा कुठेतरी गायब व्हायचो".

"काम करणं कमी केलं होतं. मला काम करता येत नव्हतं". 

"त्या काळात माझं वाचन वाढलं. खूप फिरलो. इंडस्ट्रीशिवाय अनेक लोकांशी कनेक्ट झालो". 

"त्यातून बाहेर येण्यासाठी मी थोडा वेळ थांबलो. स्वत:ला वेळ दिला". 

"माणूस म्हणून स्वत:ला डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टींची मला आयुष्य जगण्यासाठी मदत झाली".

"त्यामुळे कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप नाही झाला". 

ब्रेकअपनंतर सुयशनं आयुषीशी लग्न केलं. आयुषी डान्सर आणि मॉडेल आहे. 

तर अक्षयानं अभिनेता हार्दीक जोशीबरोबर लग्नगाठ बांधली.

Sonali Patil : हिल हिल पोरी हिला, तुझ्या कंपळीला टिळा!

Heading 3

Click Here