अभिनेता संजय खान यांची संघर्षमय वाटचाल

3 जानेवारी 1941 रोजी कर्नाटकात जन्मलेले संजय खान 'दी स्वोर्ड ऑफ टिपू सुलतान' सीरियलमुळे प्रसिद्ध झाले. 

12व्या वर्षी राज कपूर यांचा 'आवारा' सिनेमा पाहून संजय यांनी या क्षेत्रात यायचं ठरवलं.

1990 साली 'दी स्वोर्ड ऑफ टिपू सुलतान टीव्ही सीरियलचं दिग्दर्शन संजय यांनी केलं.

'टिपू सुलतान'च्या चित्रिकरणावेळी झालेल्या अपघातानंतर संजय यांच्यावर 13 दिवसांत 73 सर्जरीज झाल्या. 

'टारझन गोज टू इंडिया' या फिल्मचे ते सहाय्यक दिग्दर्शक होते.

1964मध्ये संजय यांनी चेतन आनंद दिग्दर्शित 'हकीकत'मध्ये छोटी भूमिका केली. त्याच वर्षी त्यांचा 'दोस्ती' सिनेमाही सुपरहिट झाला.

दस लाख, दिल्लगी, बेटी, अभिलाषा, एक फूल दो माली, इंतकाम, चोरी चोरी, मेला हे संजय खान यांचे प्रमुख चित्रपट.

'अब्दुल्ला' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान संजय यांचं नाव अभिनेत्री झीनत अमान यांच्याशी जोडलं गेलं.

1978मध्ये संजय-झीनत जैसलमेरमध्ये विवाहबद्ध झाले; मात्र अल्पावधीतच विभक्त झाले.

1980 साली संजय यांनी एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये झीनतला खूप मारलं होतं.

धर्मात्मा, कुर्बानी या गाजलेल्या सिनेमांतले ज्येष्ठ अभिनेते फिरोज खान हे संजय खान यांचे मोठे बंधू.