आई कुठे काय करते सिरीयल स्टार कास्ट
स्टार प्रवाहवर प्रदर्शित होणारी 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे.
मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने साकारली आहे. ती प्रेक्षकांची लाडकी बनली आहे.
संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसलेने साकारली आहे.
अभिनेता मिलिंद गवळी अनिरुद्धची भूमिका साकारत आहे.
मालिकेतील आप्पा म्हणजेच विनायक देशमुख यांची भूमिका अभिनेते किशोर महाबोले साकारत आहेत.
कांचन देशमुख (आजी) च्या भूमिकेत अभिनेत्री अर्चना पाटकर आहेत.
यश देशमुखची भूमिका अभिषेक देशमुख साकारत आहे.
अविनाश देशमुख म्हणून अभिनेते शंतनू मोघे पहायला मिळतात.
गौरी कारखानीसची भूमिका गौरी कुलकर्णी साकारत आहे.