कुणीतरी येणार गं...राधा सागरचं डोहाळजेवण!

‘आई कुठे काय करते’ मालिकेतून अभिनेत्री राधा सागर घराघरात पोहोचली.

काही दिवसांपूर्वीच तिने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली होती.

अभिनेत्रीनं लवकरच आई होणार आहे.

राधा सागरने तिच्या वाढदिवसादिवशीच चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती.

आता अभिनेत्रीच्या डोहाळजेवणाचे फोटो समोर आले आहेत.

राधाचं डोहाळजेवण पारंपरिक पद्धतीने साजरं झालं.

राधाच्या डोहाळजेवणाचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

राधाने खऱ्या आयुष्यात लग्न केलं असून तिच्या नवऱ्याचं नाव सागर कुलकर्णी आहे.

आता या जोडप्याच्या आयुष्यात लवकरच सुखाचे क्षण येणार आहेत.