आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीचा लाडका यश
अभिनेता अभिषेक देशमुखनं यशची भूमिका उत्तम साकारली आहे.
मालिकेत सध्या यशचा ब्रेकअप झाला आहे. त्यामुळे तो फार अपसेट आहे.
खऱ्या आयुष्यातही अभिषेकचा असाच ब्रेकअप झाला होता.
एका मुलाखतीत अभिषेक म्हणाला की, "कॉलेजमध्ये असताना माझे 1-2 ब्रेकअप झाले होते".
"त्या सगळ्या ब्रेकअप वेळी मला खूप त्रास झाला होता".
"मला त्या परिस्थितीत खूप वाईट वाटलं होतं. मी खूप रडलो होतो".
"ब्रेकअप नंतर माझा देवदास झाला होता. मी असा कुठेही बसून राहायचो".
"मी खूप प्रयत्नाने त्यांची नावं विसरलोय".
"त्या ब्रेकअपच्या वेळी मला काय वाटलं होतं ते मी आता आठवतोय".
"तेव्हाच्या ब्रेकअपचा मला आता यशची भूमिका साकारताना मदत होतेय", असं अभिषेकनं सांगितलं.
अभिषेकचं कृतिकाबरोबर लग्न झालं आहे. कृतिका देखील अभिनेत्री आहे.
अमृता ही अभिषेकची सख्खी बहिण आहे.
Click Here