आई बनली नवरी,अरुंधती-आशुतोषचा लग्नसोहळा! 

आणखी पाहा...!

'आई कुठे काय करते' मालिकेत तो खास क्षण अखेर आलाच.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारं अरुंधती आणि आशुतोषचं लग्न अखेर संपन्न झालं.

अरुंधतीने आशुतोषसोबत लग्नगाठ बांधत त्याच्याशी साता जन्माचं नातं जोडलं आहे.

अनेक संकटांवर मात करत अरुंधती-आशुतोष एकत्र आले आहेत.

या दोघांच्या लग्नातील काही खास फोटो आता समोर आले आहेत.

तर आशुतोषसुद्धा पारंपरिक लूकमध्ये नवरा मुलगा शोभून दिसत आहे.

अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नातील हे सुंदर फोटो फारच पसंत केले जात आहेत.

शिवाय या फोटोंमध्ये दोघांच्या लग्नातील विधीही पाहायला मिळत आहेत. 

अरुंधती कांचनचा निरोप घेताना दोघीनांही अश्रू अनावर झाले.