Heading 3
Heading 2
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षकांना प्रचंड आतुरता असते.
सध्या मालिकेत अरुंधतीला यशबाबत वाईट स्वप्न पडतं आणि ती अस्वस्थ होते असा ट्रॅक सुरु आहे.
अशातच यशचा संपर्क होत नाही त्यामुळे अरुंधती जास्तच घाबरते.
मात्र नव्या प्रोमोमध्ये यश सुखरुप असल्याचं समोर आलं आहे.
त्यांनंतर एपिसोड थोडा रंजक बनविण्यासाठी अरुंधती-आशुतोषचा रोमान्स दाखविण्यात येणार आहे.
लग्नानंतरचे हे क्षण अरुंधती आणि आशुतोषसाठी खास आहेत.
येत्या एपिसोडमध्ये अरुंधती सकाळी-सकाळी अंघोळ करुन बाथरुममधून बाहेर येते.
तिचे भिजलेले केस आणि मनमोहक सौंदर्य पाहून आशुतोष तिच्याकडे एकटक पाहात राहतो.
आशुतोषकडे पाहून अरुंधतीही नकळत लाजते.