दीपा अरुंधतीला मोठा धक्का! 

आई कुठे काय करते मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पाहिली जाते. 

मालिकेतील अरुंधती हे पात्र प्रेक्षकांना
प्रचंड आवडतं. 

तर रंग माझा वेगळा ही मालिका गेली
अनेक महिने टॉप 1वर होती. 

पण आता या दोन्ही मालिकांना छोट्या
स्वरानं मागे टाकलं आहे. 

'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका
नंबर 1 मालिका ठरली आहे. 

स्वरा नंबर वन ठरल्यानं अरुंधती आणि दीपाला चांगलाच धक्का बसला आहे. 

चिमुकली स्वरा तिच्या निरागस अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 

स्वराचा स्वराज झाल्यापासून तर मालिकेची रंजकता आणखी वाढली आहे. 

स्वराची भूमिका बालकलाकार अवनी
तायवडे हिनं फार उत्तमरित्या साकारली
 आहे.