Heading 3
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं वयाच्या 67 व्या वर्षी निधन झालं आहे.
सतीश यांच्या अचानक निधनाने मनोरंजन सृष्टीसह सर्वत्र शोककळा पसरली आहे.
सध्या त्यांचे अनेक किस्से आणि त्यांच्या आयुष्याशी निगडित अनेक गोष्टी आता व्हायरल होत आहेत.
तुम्हाला सांगू इच्छितो कि, सतीश कौशिक यांचं अभिनेत्री नीना गुप्तांवर प्रचंड प्रेम होतं.
नीना गुप्ता यांनी आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये ही गोष्ट उघड केली होती.
नीना यांनी सांगितलं होतं की, त्या प्रेग्नेंट असताना सतीशनी त्यांना प्रयोज केलं होतं.
त्या लग्नाआधीच प्रेग्नेंट असूनसुद्धा अभिनेते त्यांच्यासोबत लग्न करायला तयार होते.
इतकंच नव्हे तर होणाऱ्या अपत्याला जगासमोर आपलंच मुल असल्याचं सांगायलाही तयार होते.
परंतु नीनानीं त्यांना नकार देत सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला होता.