Heading 3
Heading 2
कंगना रनौत आज 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.अभिनेत्री चित्रपटांपेक्षा जास्त वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पाहूया अशीच काही प्रकरणे.
महेश भट्ट यांच्या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात करणाऱ्या कंगना रनौतने आरोप केला होता की, महेश भट्ट यांनी तिला स्वतःच्या चित्रपटाच्या प्रीमियरला जाण्यापासून रोखले होते आणि तिच्या दिशेने चप्पल फेकलेली.
कंगना सुरुवातीला विवाहित आदित्य पांचोलीच्या प्रेमात होती. दोघेही लिव्ह-इनमध्ये होते. नंतर अभिनेत्रीने त्यावर शारीरिक शोषणाचा आरोप करत खळबळ माजवलेली.
अभिनेत्री शेखर सुमनचा लेक अध्ययनसोबत नात्यात होती. मात्र अभिनेत्याने नंतर कंगनावर जादूटोणा करत असल्याचा आणि आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप केला होता.
कंगना आणि हृतिक रोशनचं नातं चांगलंच वादग्रस्त ठरलं होतं.तिने अफेयर असल्याचं म्हटलेलं तर अभिनेत्याने ते नाकारलेलं. यानंतर कंगनाने मुंबई क्राईम ब्रांचकडे धाव घेतलेली.
कंगना रनौतने जावेद अख्तर यांच्यासोबतही पंगा घेतला होता. सुशांत राजपूतच्या मृत्यूनंतर एका प्रकरणात गीतकाराचं नाव घेत रोष ओढवून घेतला होता.
तापसी पन्नूसोबतही तीचं बिनसलं होतं. कंगनाच्या बहिणीने तापसीला कंगनाची स्वस्त कॉपी म्हटल्याने वाद झालेला.
स्वरा भास्करला बी ग्रेड अभिनेत्री म्हटल्यानेही कंगना वादात अडकलेली.
करण जोहरसोबत पंगा घेत त्याला नेपोटीझम्स करणारा व्यक्ती म्हटलं होतं.
कंगनाच्या ऑफिसवर बीएमसीने जेसीपी फिरवल्यानंतर अभिनेत्रीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
पंजाबमधील कृषी विधेयकाला विरोध करणार्या शेतकर्यांना दहशतवादी संबोधत कंगनाने खळबळ माजवली होती.