अजय देवगण काशी विश्वनाथ चरणी नतमस्तक!

अजय देवगणचा  ‘दृश्यम २’ हा चित्रपटबॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

अनेक दिवसांनी प्रेक्षक एका बॉलिवूड चित्रपटाला गर्दी करत आहेत.

आता प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात ‘दृश्यम २’ने 100 कोटींचा आकडा पार केला आहे.

आता याच निमित्ताने अजय देवगणने वाराणसीच्या काशी विश्वनाथच्या मंदिरात हजेरी लावली आहे.

अजय देवगण सध्या काशी विश्वनाथच्या चरणी नतमस्तक झाला आहे.

“खूप दिवसांनी काशी विश्वनाथचं दर्शन घ्यायची संधी मिळाली. हर हर महादेव'' म्हणत अजयने हा फोटो शेअर केला आहे.

एवढच नाही तर अजयच्या आगामी 'भोला' चा टिझर देखील रिलीज झाला आहे.

 'भोला' च्या टिझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.

एकूणच ‘दृश्यम २’चं यश आणि आगामी ‘भोला’ या चित्रपटासाठी अजय देवगण प्रार्थना करत असल्याची चर्चा  रंगत आहेत.