'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीझनमुळे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप. 

या रिअॅलिटी शोमधून तिची लोकप्रियता आणखीनच वाढलेली पहायला मिळाली.

बिग बॉसमुळे वीणाचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.

 वीणानं नवं फोटोशूट केलं असून इन्स्टाग्रामवर तिने हे फोटो शेअर केले आहेत.

वीणाचं नवं फोटोशूट साडीमधील असून तिचं साडीप्रेम हे वारंवार पहायला मिळतं. 

वीणाच्या या नव्या फोटोशूटला नेहमीप्रमाणे चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. 

वीणा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. 

ती विविध फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.

'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतून वीणानं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.

 या मालिकेनं ती चांगलीच प्रकाश झोतात आली.