खाजगी आयुष्यविषयीच्या अफवांवर सायलीने मांडलं हे मत
सायली संजीव मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सायलीने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सायली तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चांगलीच चर्चेत असते.
अनेकदा तिच्याबद्दल विविध अफवा पसरत असतात. आता याबद्दल तिने तिचं मत मांडलं आहे.
एका मुलाखतीत सायली म्हणाली, 'माझ्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा मला कधीही त्रास होत नाही.'
ती म्हणाली, 'आपण त्यांना अफवा म्हणतो म्हणजेच ती खोटी गोष्ट आहे. त्यामुळे कधी ना कधी खरी गोष्ट लोकांसमोर येईलच.
'त्यामुळे कशाला त्याबद्दल एवढा विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायचा!' असं ती म्हणाली.
सायली संजीव हिचं नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याच्याशी जोडलं गेलं होतं.
पण त्यांच्यात फक्त मैत्री असल्याचं सायलीने नेहमीच सांगितलं आहे.