अभिनेत्री रिंकू राजगुरु सैराटमुळे घराघरांत पोहचली. 

 सिनेमात रिंकूनं साकारलेली आर्ची महाराष्ट्रानं डोक्यावर घेतली.

रिंकूने नुकतंच झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात हजेरी लावली. 

तुम्हाला आधीच पोहता येत होत की तुम्ही चित्रपटासाठी शिकलात?, असा प्रश्न तिला विचारण्यात आला.

या कार्यक्रमात रिंकूने सैराटमधील विहिरीत उडी मारण्याच्या सीनबाबत खुलासा केला.

मला आधीपासूनच पोहायला येत होतं. मला माझ्या बाबांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये पोहायला शिकवलं, असं रिंकू म्हणाली.

रिंकू पुढे म्हणाली, पण उडी मी पहिल्यांदाच मारली होती. तेव्हा मला फार भिती वाटली होती. 

 मी या शॉर्टसाठी नकोच म्हणत होते. तेव्हा नागराज मंजुळे मला म्हणाले, 'मारते की देऊ ढकलून'.

मग मी थोडा वेळा घेऊन तो सीन केला.

पहिल्या 2 टेकमध्ये मी सीन कम्प्लिट केला होता.

अभिनेत्री दिशा पटानीचे Well Toned Abs आणि जबरदस्त फिगरला तोड नाही