आत्महत्या करणारी मॉडेल आकांक्षा मोहन कोण होती?

30 वर्षीय मॉडेल आकांक्षा मोहनने सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली आहे. 

आकांक्षानं केलेल्या आत्महत्येच्या बातमीनं सगळीकडे एकच खळबळ उडाली. 

आकांक्षानं पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

आकांक्षा मोहन ही एक अभिनेत्री आणि मॉडेल होती. तिने काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

16 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या सिया चित्रपटात आकांक्षाने शेफालीची भूमिका साकारली होती. 

आकांक्षाने विविध जाहिरातींसाठी मॉडेल म्हणून काम केले. तिने वेगवेगळ्या ब्रँडसाठी फोटोशूटही केलं होतं.

ती सोशल मीडियावरही सक्रिय होती. तिचे इंस्टाग्रामवर 11 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

आकांक्षानं उचलेल्या या धक्कादायक पावलामुळे सगळेच हैराण आहेत. 

 'आपल्याला शांती हवी असून, आपण आनंदी नव्हतो आणि आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरु नये', असं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.