मलायका-अर्जुनच्या नात्यात दुरावा?

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहे.

दोघांच्याही रिलेशनशिपच्या चर्चा कायमच पहायला मिळतात. 

दोघे कधी लग्नबंधनात अडकणार याची वाट त्यांचे चाहते बघत आहेत.

मात्र यावेळी दोघांमध्ये काहीतरी बिनसलं की काय अशी चर्चा रंगलीये. 

एका मुलाखतीत मलायकाने लग्नाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. 

 मला वाटतं की लग्नासाठी घाई करू नये कारण तो एक सामाजिक दबाव आहे, असं मलायका म्हणाली. 

मलायकाच्या उत्तरानं चाहत्यांना त्यांच्यामध्ये दुरावा आलाय का?, असा प्रश्न पडलाय. 

अर्जुनविषयी मलायका म्हटली, मी अर्जुनशी फक्त अटॅच नाही तर तो माझा खूप चांगला मित्रही आहे. 

मला वाटते की आम्ही दोघे एकमेकांचे सर्वात मोठे चीअरलीडर्स आहोत.