Deepika Padukoneला झालेला हार्ट अरिथमिया काय आहे? 

अभिनेत्री दीपिका पादुकोण आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 

अभिनेत्रीला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णलयात दाखल केल्याचं समोर आलं होतं.

तिचे हृदयाचे ठोके वाढले असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यालाच हार्ट आरिथमिया म्हणतात. 

यापूर्वीही दीपिकाला असा अस्वस्थपणा जाणवला होता. 

आपल्या हृदयाचे ठोके अनियमित होणे म्हणजेच हार्ट अरिथमिया होय. 

हा एक प्रकारचा हृदय विकार आहे. 

हृदयाचे ठोके चुकणे, छाती दुखणे, हृदयाची गती वाढणे किंवा कमी होणे, अशी लक्षणं हार्ट अरिथमियाची आहे. 

उच्च रक्तदाब, नैराश्य, व्यायाम, तणाव अशी कारणे या आजारामागे आहेत. 

हृदयाशी संबंधित जुन्या आजाराने देखील ही समस्या उद्भवू शकते.