गोल्डन गाऊनमध्ये प्रेग्नंट आलियाचा जलवा

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या काम करत तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे.

नुकतंच आलियाने सिंगापूरमध्ये टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड्समध्ये हजेरी लावली.

आलियाला टाईम अवॉर्ड मिळाल्यानंतर तिनं भाषण केलेलं पहायला मिळालं.

भाषणात आलिया म्हणाली, 'माझा भारत महान आहे'.

आपल्या कारकिर्दीबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना तिने सांगितले की भारत सर्वोत्तम आहे. भारतामुळे ती आज इथे आहे.

आलिया भट्टला सिनेमातील तिच्या कामासाठी हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार अशा लोकांना दिला जातो, जे आपल्या क्षेत्रात काहीतरी वेगळे करत असतात.

या अवॉर्ड फंक्शनसाठी आलियाने खास गोल्डन कलरचा गाऊन परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती अवॉर्ड आणि बेबी बंप दोन्हीही फ्लॉन्ट करताना दिसून आली.

आलियाच्या या नव्या फोटोंनी सध्या सगळ्यांचं  लक्ष वेधून घेतलंय.