टेलिव्हिजनच्या गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे पुढचं पाऊल
तब्बल 6-7 वर्ष मालिका सुरू होती.
कल्याणी आणि आक्का साहेब ही सासू सुनेची जोडी चांगलीच प्रसिद्ध झाली.
कल्याणी, देवकी, रूपाली, स्वप्नाली, कांचनमाला, चिंता मामा, सोहम ही मालिकेतील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
पुढचं पाऊल ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
13 फेब्रुवारीपासून संध्याकाळी 6 वाजता प्रवाह पिक्चर या चॅनेलवर पुढचं पाऊल सुरू होणार आहे.
नेहमी नटून थटून, केसात गजरा माळलेल्या आक्कासाहेब पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.
आक्कासाहेब आणि कल्याणीला पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे.
पुढचं पाऊल पुन्हा टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का?