मी मरेल तेव्हा मला नववधू सारखं सजवा

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1956 रोजी झाला.

स्मिता पाटीलचा वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी अचानक झालेला मृत्यू हे अजूनही एक गूढच आहे. 

स्मिता पाटील यांची एक शेवटची इच्छा होती. त्या म्हणायच्या मृत्यूनंतर मला नववधू सारखं सजवा.

त्यांचा मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत म्हणतो, 'स्मिता म्हणायची की दीपक मेल्यावर मला नववधू सारखं सजव.'

एकदा तिने एका चित्रपटात राज कुमारला मरुन मेकअप करताना पाहिले आणि मला सांगू लागली की दीपक माझा असा मेकअप कर. मी म्हणालो मी हे करु शकत नाही. 

एके दिवशी मी तिचा असा मेकअप केला हे खूप वाईट आहे. जगात क्वचितच असा मेकअप आर्टिस्ट असेल ज्याने असा मेकअप केला असेल.

मृत्यूनंतरच्या तिच्या शेवटच्या इच्छेनुसार स्मिताचा नववधूप्रमाणे मेकअप करण्यात आला.

चित्रपटाच्या पडद्यावर सहज आणि गंभीर दिसणारी स्मिता पाटील खऱ्या आयुष्यात खूप खोडकर होत्या.

चित्रपटात येण्यापूर्वी स्मिता पाटील बॉम्बे दूरदर्शनवर मराठीत बातम्या वाचायच्या.