अभ्यास करताना झोप येत असेल तर काय करावे?

परिक्षेच्या आधी सर्वांना एकाग्रतेने अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे.

नोव्हेंबर डिसेंबर पासून ते मे पर्यंत आता सर्वत्र परिक्षेचे वातावरण असेल.

यावर्षी सर्व परिक्षा ऑफलाईन मोडमध्ये होत आहेत. 

प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची पद्धत/शैेली ही वेगळी असते.

काही मुलांना अभ्यास करताना झोप येते, अशी तक्रार असते.

योग्य डाएट न घेतल्याने किंवा रात्री पूर्ण झोप न झाल्याने अभ्यास करताना झोप लागते.

अभ्यास करताना झोप येऊ नये यासाठी नेहमी सरळ बसून अभ्यास करावा.

तसेच जर अभ्यास करताना अजिबात मन लागत नसेल तर फिरताना उजळणी करा.

तसेच कधी-कधी अभ्यास करताना मध्ये ब्रेक घेऊन चहा किंवा कॉफी घ्या.