महाराष्ट्राच्या चित्ररथातून यंदा स्त्रिशक्तीचा जागर
यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाची राजधानी दिल्लीमध्ये होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार आहे.
साडेतीन शक्तिपीठं आणि स्त्रीशक्तीचा जागर या संकल्पनेवर आधारीत हा चित्ररथ आहे.
राज्यात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं प्रसिद्ध आहेत, या शक्तिपीठाचं दर्शन या चित्ररथावर होणार आहे.
कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापुरची तुळजाभवानी माता, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तश्रृंगी माता यांचा समावेश शक्तिपीठामध्ये होतो.
नवी दिल्लीमध्ये तीस जणांचा चमू युद्धपातळीवर हा चित्ररथ साकारत आहे.
या चित्ररथाची पहिली झलक आता समोर आली असून, चित्ररथाच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला आहे.
या चित्ररथाच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन अवघ्या देशाला घरबसल्या होणार आहे.
या चित्ररथाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या संचलनात हा चित्ररथ सर्वांचं लक्ष वेधून घेईल यात शंका नाही.