बलात्कारप्रकरणी तुरुंगात असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम 40 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला आहे.
राम रहीमला गेल्या 3 महिन्यांत दुसऱ्यांदा पॅरोल मिळाला आहे.
यापूर्वी तो 14 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता.
अशात पॅरोलची सुट्टी कोणाला मिळते? असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल ना?
कैद्याचा जवळचा नातेवाइक आजारी असेल किंवा मृत्यू झाल्यावर पॅरोल रजा मंजूर होते.
यासाठी गुन्हेगाराची वागणूकही तितकीच चांगली असावी लागते.
यासाठी कैद्यी कारागृह अधीक्षकांकडे अर्ज करतो. तो अर्ज पोलीस, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात येतो.
पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतर कारागृह विभागीय आयुक्त कैद्याला किमान 30 दिवसांची पॅरोल रजा देतात.
ती जास्तीत जास्त 90 दिवस देता येते.