काही दिवसांपूर्वी पुण्यात सेक्सटॅार्शनमुळे दोन जणांनी आपलं जीवन संपवलं.
ओडिशा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही 'सेक्स्टॉर्शन'वरून गदारोळ झाला.
हा केवळ महाराष्ट्र, ओडिशाचा विषय नाही. तर राजस्थान आणि हरियाणातही हे प्रकार वाढलेत.
सेक्सटोर्शन म्हणजे काय? या सापळ्यात अडकल्यानंतर न घाबरता पोलिसांची मदत कशी घ्यावी.
एखाद्याच्या सेक्स अॅक्टिव्हिटी रेकॉर्ड करून त्याला ब्लॅकमेल करणे म्हणजे सेक्सटोर्शन होय.
सेक्सटोर्शनमध्ये अडकू नये यासाठी काय काळजी घ्यावी?
कोणत्याही अनोळखी कॉलला एंटरटेन करू नये.
काही लोक टेलिमार्केटिंग कॉलवरही मुलींचा आवाज ऐकून टाइम पास करतात. ही चूक महागात पडू शकते.
जर कोणी तुम्हाला त्याचा न्यूड फोटो अथावा व्हिडीओ पाठवून तुमचाही मागत असेल तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे.
अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, पोलिसांकडे तक्रार करा.