पुण्यातील MPSC तरुणीवर कोयत्याने वार

पुण्यात दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली. 

MPSC करणाऱ्या तरुणीवर MPSC करणाऱ्या मित्रानेच कोयत्याने हल्ला केल्याचं समोर आलंय.   

 हल्ल्यावेळी मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. ज्यामुळे तिचे प्राण बचावले. 

एकतर्फी प्रेमातून या तरुणानं तरुणीवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. 

पुण्याच्या सदाशिव पेठ भागातील ही घटना आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलंय.

 मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलीला त्रास देत होता. 

 मुलीला फ्रेन्डशिप ठेवायची नाही सांगूनदेखील त्याने तिला फोन करुन धमकी दिली. 

आरोपी मुलाच्या घरी सांगितल्याच्या रागातून त्याने मुलीवर कोयत्याने हल्ला केला. 

कोयत्याच्या हल्ल्यात मुलीला डोक्यावर टाके पडले असून हातावरही जखमा झाल्या आहेत.