IAS-IPS मध्ये वाद, या दोन सुंदर महिला अधिकारी कोण?
सध्या कर्नाटकमध्ये दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
डी रूपा यांनी रोहिणी सिंधुरीने पुरुष अधिकाऱ्यांसोबत तिचे खाजगी फोटो शेअर केल्याचा आरोप केला आहे.
कर्नाटक केडरच्या IPS रूपा मौदगील या 2000 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. सायबर क्राइम विभागाच्या प्रमुख असलेल्या रूपा या भारतातील पहिल्या महिला आहेत.
रोहिणी सिंधुरी या कर्नाटक कॅडरच्या 2009 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. सिंधुरी यांनी केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक केलं आहे. रोहिणी सिंधुरी यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर सुधीर रेड्डी यांच्यासोबत लग्न केले आहे.
IPS रूपा या कर्नाटकातील दावणगेरे येथील रहिवासी आहेत. त्यांनी कुवेम्पू विद्यापीठ, शिवमोग्गा येथून पदवी आणि बंगळुरू विद्यापीठातून मानसशास्त्रात पीजी केले आहे.
IPS रूपा या कन्नड सिनेमातील पार्श्वगायिका देखील आहेत. 2019 मध्ये त्यांनी बायलतादा भीमन या कन्नड चित्रपटातील गाण्याला आवाज दिला. IPS रूपा यांची ओळख एक कडक पोलीस अधिकारी अशी आहे.
दरम्यान, कर्नाटकात आयपीएस अधिकारी डी रूपा मौदगील आणि आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांची कोणतेही पद न सोपवता बदली करण्यात आली आहे.
दोन महिला नोकरशहांमधील वाद रस्त्यावर आल्यावर कर्नाटकच्या प्रशासकीय वर्तुळात एक प्रकारचा भूकंप झाला.
या प्रकरणात आता काय होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.