सूनेनं टाळलं काम, सासूने डोक्यात झाडली गोळी!
सासू आणि सून यांच्यातला वाद हा प्रत्येक घराघरात असतो. पण सून काम करत नाही म्हणून सासूने गोळी झाडून ठार मारल्याची घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमधील अमरोहा इथं ही घटना घडली. कोमल पैतृक असं मृत सुनेचं नाव आहे.
कोमल ही मोठ्या घरातली मुलगी होती. त्यामुळे ती घरात फारसं काम करत नव्हती.
पण सून किचन आणि घरात काम करत नाही हे पाहून सासू नेहमी तक्रार करायची.
एवढंच नाहीतर सासूही सुनेचे माहेरातून पैसे आणण्यासाठी तगादा सुद्धा लावत होती. यामुळे दोघींमध्ये घरात अनेक वेळा भांडणंही झाली.
घरात कामावरून पुन्हा एकदा दोघींमध्ये भांडणं झालं आणि रागाच्या भरात सासूने सुनेच्या डोक्यात गोळी झाडली.
सूनेची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह हा रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात फेकून दिला.
घरामध्ये दरोडा पडला होता, असं सांगून सासूने ड्रामा रचला.
पण जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा कोमलच्या आईने सासूविरोधात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सासूला अटक केली.
पुण्यातील
MPSC तरुणीवर कोयत्याने वार
Heading 3
इथं क्लिक करा.