दिल्लीतल्या भयावह श्रद्धा वालवकर हत्याकांडाची पुनरावृत्ती 

मुंबईच्या मीरा रोडमध्ये घडल्याची धक्कादायक घटना समोर 

लिव इनमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट

याप्रकरणी पोलिसांनी 56 वर्षीय आरोपी मनोज सानेला अटक 

सरस्वती वैद्य असं मृत महिलेचं नाव आहे. ती 32 वर्षांची होती

आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे कुकरमध्ये उकळायचा आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून पिशवीतून इमारतीच्या मागील गटारात फेकायचा.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने कटर मशीनच्या सहाय्याने तुकडे केले होते

याशिवाय तो कुत्र्यांनाही तिचं मांस खायला घालायचा अशी माहिती समोर आली आहे

 तीन वर्षांपासून हे जोडपे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते

 शेजारच्यांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली

 पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर या भयानक घटनेचा उलगडा झाला

आरोपीला महिलेचं अफेअर सुरू असल्याचा संशय होता, यातूनच तीन-4 दिवस आधी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं

याचा राग मनात होता आणि त्यातूनच हा धक्कादायक प्रकार घडला