बोगस देवमाणूस, महिला रुग्णांच्या केल्या 80 क्लिप रेकॉर्ड
कोल्हापूरमध्ये एका बोगस डॉक्टरने सुमारे 80 महिलांच्या अश्लील चित्रफीत तयार केल्या आहेत. या चित्रफिती व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी तक्रार द्यायला कोणी समोर न आल्याने पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलेले नाही. त्यामुळे या डॉक्टरचे मात्र फावले असून तो फरार झाला आहे.
कागल तालुक्यातील मुरगुड मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे.
कागल तालुक्यातील मुरगुड मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे.
निसर्गोपचाराच्या नावाखाली दवाखाना थाटलेल्या डॉक्टरने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढले
सुमारे 80 हुन अधिक महिलांच्या त्याने क्लिपही तयार केल्या. या क्लिप सध्या व्हायरल झाल्या आहे.
एका निनावी पत्राद्वारे महिलांनी या प्रकरणाची वाचा फोडली असून सुमारे 400 जणांनी पत्र लिहिले पण पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही
जिल्हा पोलीस अधीक्षकांना उद्धव ठाकरे गटाने निवेदन दिले असून सखोल चौकशीची मागणी केली.
गेल्या चार दिवसांपासून याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. पोलीस मात्र कानावर हात ठेवून असल्याची स्थिती आहे.
पोलिसांनी पुढे होऊन या प्रकरणी सुमोटो दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
लेलुँगा असं ही आहे गावाचं नाव! पाहा ही स्टोरी