80 एन्काउंटर करणारे दया नाईक इज बॅक!

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी करण्यात आल्या. यामध्ये चकमक फेम पोलिस निरीक्षक दया नायक यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. 

सध्या दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत आहेत. 

आता बदलीनंतर त्यांची पुन्हा एकदा मुंबई पोलिसात एन्ट्री होणार आहे. 

दया नायक यांची 2021 मध्ये एटीएसमधून गोंदियात बदली केली होती.

एंटालिया-मनसुख हिरेन प्रकरणामुळे त्यांची बदली केले गेली होती. तेव्हा प्रशासकीय बदली असल्याचं कारण सांगण्यात आलं होतं. 

दया नायक यांनी त्यावेळी बदलीच्या आदेशाला मॅटमध्ये आव्हान दिलं होतं. त्यानंतर त्यांच्या बदलीच्या आदेशाला मॅटने स्थिगिती दिली होती. तेव्हापासून ते एटीएसमध्ये कार्यरत आहेत.

एन्काउंटर स्पेशालिस्ट अशीही दया नायक यांची ओळख आहे. 1995 मध्ये दया नायक हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झाले होते. 

त्यांनी गुन्हे अन्वेषण शाखेत प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं. प्रदीप शर्मा यांच्या एन्काउंटर पथकात ते होते. 

1996मध्ये दया नायक यांनी पहिला एन्काउंटर केला. त्यांनी जवळपास 80 एन्काउंटर केले आहेत.

त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांच्यावर बॉलीवूडमध्ये सिनेमेही बनले आहे.