राजगडच्या पायथ्याशी MPSC उत्तीर्ण 26 वर्षीय दर्शना पवारचा मृतदेह सापडला.
12 जून रोजी दर्शना राजगडावर राहुलसोबत फिरायला गेली होती. 18 जून रोजी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.
आता दर्शनाच्या हत्याप्रकरणी तिचा मित्र राहुल हंडोरेला मुंबईतून अटक केलं आहे.
दर्शना आणि राहूल एकमेकांचे नातेवाईक होते. गेल्या दोन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते.
मात्र परीक्षेपूर्वी राहुलने ब्रेकअप केलं आणि ती अधिकारी झाल्यावर तो पुन्हा लग्नासाठी मागे लागला होता.
राहुलने दर्शनाच्या घरी MPSC उत्तीर्ण होईपर्यंत थोडा वेळ मागितला होता.
दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्या मुलासोबत जमवल्यामुळे राहूल अस्वस्थ होता.
दर्शनाच्या घरुन राहुलला प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याने राजगडाच्या पायथ्याशी तिची हत्या केली.
नव्या करिअरची सुरुवात करण्यापूर्वीच दर्शनाच्या झालेल्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली.