न्यूयॉर्कहून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानात धक्कादायक घटना घडली.
विमानाच्या बिझनेस क्लासमधील पुरुष प्रवाशाने नशेत महिला प्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली.
26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या फ्लाइट AI-102 मध्ये ही घटना घडली.
एका पुरुष प्रवाश्याने नशेत एका महिलेवर लघुशंका केली.
पीडित महिलेने सांगितलं, नशेत प्रवासी तिच्या सीटजवळ आला आणि तिच्या अंगावर लघुशंका केली.
ही घटना घडताच पीडित महिलेनं तातडीनं विमानातील केबिन क्रू मेंबर्सना याची माहिती दिली.
केबिन क्रू मेंबर्सना माहिती दिल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाई झाली नाही.
अखेर महिलेनं टाटा समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहून घटनेची माहिती दिली.
त्यानंतर एअर इंडियाने याप्रकरणी चौकशी सुरु केली.