कलम 144 म्हणजे काय रे भाऊ?

अमुकतमुक ठिकाणी पोलिसांनी कलम 144 लागू केल्याचं तुमच्याही कानावर कधी ना कधी आलं असेल. 

वास्तविक, कलम 144 फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC अंतर्गत येते. 

याचा उपयोग समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी केला जातो. 

कलम 144 नुसार 4 किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येण्यावर बंदी असते. 

या कलमाचा वापर बंड, दंगली, हिंसाचार रोखण्यासाठी केला जातो.

ज्या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवू शकते, तिथेही खबरदारीचा उपाय म्हणून कलम 144 लागू केलं जातं.

कलम 144 चे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला घटनास्थळी तात्काळ अटक करण्याचा अधिकार पोलिसांना आहे.

हे कलम 1973 साली पास झाले असले तरी 1 एप्रिल 1974 रोजी देशात लागू झाले.

न्यायालयीन भाषेत याला CrPC चे कलम-144 असेही म्हणतात.