बँडस्टँडला सेल्फी अन् तेथेच सदिच्छा सानेचा शेवट

पालघर येथील सदिच्छा साने प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सदिच्छा साने हिची हत्या करण्यात आली होती. 

सदिच्छाची हत्या जीवरक्षक मिथू सिंहने केल्याचे कबुल केले आहे. हत्येनंतर मृतदेह समुद्रात फेकला होता.

पालघर येथील रहिवासी असलेली सदिच्छा ही मुंबईतील जे. जे. ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती.

तांत्रिक पुराव्यांवरून तिचे शेवटचे लोकेशन वांद्रे बँड स्टॅण्ड येत होते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी वांद्रे पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती. 

वांद्रे बँड स्टॅण्ड येथे तिने जीवरक्षक मिथू सिंगसोबत सेल्फीदेखील काढली होती. 

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला त्याचा मित्र अब्दुल जब्बार अन्सारी याने त्याला मदत केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.

मागच्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे 29 नोव्हेंबर 2021 रोजी ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली, ती परतलीच नव्हती. 

या तरुणीचा शोध घेण्यासाठी बॅण्ड स्टॅण्ड बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिची छायाचित्रे लावण्यात आली होती. 

याप्रकरणी भादंवि कलम 302 अंतर्गत हत्येचे कलम वाढवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.