नाळ कापताच बाळाला खिडकीतून दिलं फेकून

दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. 

 20 वर्षांच्या तरुणीनं तिच्या नवजात मुलाला अपार्टमेंटमधून खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

बदनामीच्या भीतीने तरुणीनं हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

बाळाला जन्म दिल्यानंतर मानसिक दृष्ट्या ही तरूणी अस्वस्थ झाली आणि तिने हे टोकाचं पाऊल उचललं. 

अपार्टमेंटमधीलच एका मजल्यावरून तरुणीनं बाळाला फेकून दिलं. 

अपार्टमेंटच्यासमोर नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. 

संबंधीत तरुणीची झटती घेतली असताना तिच्या डस्टबीनमध्ये रक्ताचे डाग आढळून आले.

तिची चौकशी केल्यावर तरुणीने याची कबुली दिली. 

या घटनेमुळे सध्या सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.