लिंबू कलरच्या साडीतील 'ती' अधिकारी यंदाही चर्चेत; सेल्फी घेण्यासाठी गर्दी!
2019च्या लोकसभा निवडणुकीत एका महिला मतदान अधिकाऱ्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता.
लिंबू कलरच्या साडीतल्या त्या महिला अधिकाऱ्याचं नाव होतं रीना द्विवेदी.
उत्तर प्रदेशात सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळीही त्या चर्चेत आल्या आहेत.
22 फेब्रुवारीला ड्युटीवर जात असताना त्या काळा स्लीव्हलेस टॉप, व्हाइट ट्राउझर अशा वेशात दिसल्या.
सामान्य नागरिक, मतदान अधिकारी आणि पोलीस अधिकारीही त्यांच्यासोबत सेल्फी घेताना दिसले.
'मी फॅशन फॉलो करते; मला अपडेट राहायला आवडतं, म्हणूनच मी गेटअप बदलला,' असं त्यांनी सांगितलं.
'सोपवलेली कामाची जबाबदारी चोख पार पाडण्याचा माझा कायम प्रयत्न असतो,' असंही त्या सांगतात
यंदा रीना द्विवेदी मोहनलालगंज इथल्या बुथवर Polling Officer म्हणून ड्युटी करत आहेत.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या सार्वजनिक बांधकाम विभागात लिपिक म्हणून त्या कार्यरत आहेत.
लिंबू कलरच्या साडीतल्या जुन्या फोटोप्रमाणेच यंदाच्या त्यांच्या मॉडर्न गेटअपचीही सर्वत्र चर्चा आहे.
तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?