UP Election 2022: भाजपसाठी का महत्त्वाचे आहेत योगी आदित्यनाथ?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथांची कारकीर्द चांगलीच गाजली. अजय मोहनसिंह बिश्त हे त्यांचं मूळ नाव.

5 जून 1972 रोजी उत्तराखंडमध्ये त्यांचा जन्म झाला. 22व्या वर्षी संन्यासदीक्षा ग्रहण करून योगी आदित्यनाथ हे नाव त्यांनी धारण केलं.

नाथ संप्रदायाच्या गोरखपूरमधल्या गोरक्षपीठाचे ते उत्तराधिकारी आहेत. गुरू अवैद्यनाथांच्या देहत्यागानंतर 2014 साली त्यांनी हे पद स्वीकारलं.

आदित्यनाथ 1998 मध्ये गोरखपूरमधून खासदार म्हणून निवडून आले. तेव्हा ते देशातले निवडून आलेले सर्वांत तरुण (26 वर्षं) खासदार ठरले होते. 

मतदारसंघात ग्रामसभांना भेट देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कार्यरत राहिले. 2002 मध्ये त्यांनी गोरखपुरात हिंदू युवा वाहिनी स्थापन केली.

गोरखपूरमधून 2014पर्यंत ते 5 वेळा खासदार झाले. विविध केंद्रीय मंत्रालयांचं राज्यमंत्रिपद त्यांनी भूषवलं. संसद समित्यांतही ते होते.

योगींनी 19 मार्च 2017 रोजी UPचे 22वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चांगले प्रशासक मुख्यमंत्री अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. 

गुंडगिरी, खंडणीखोरीला लगाम लावतानाच मुलींचं शिक्षण, सार्वजनिक सुरक्षितता या मुद्द्यांवर योगींनी काम केल्याचं अनेकांचं मत आहे. 

योगी आदित्यनाथ हे लेखकही आहेत. त्यांनी योगसाधनेविषयी काही पुस्तकं लिहिली आहेत.

राजकीय वर्तुळात भारतीय जनता पक्षातलं भावी केंद्रीय नेतृत्व म्हणून योगी आदित्यनाथांकडे पाहिलं जातं. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?