होळीसाठी 'ही' पर्यटनस्थळं नक्कीच असूद्या तुमच्या Bucket List मध्ये!

होळी हा सण देशभरात साजरा होत असला, तरी प्रत्येक ठिकाणी त्याचं स्वरूप वेगळं असतं. यंदा 18 मार्चला धुळवडीचा सण साजरा होत आहे

महाराष्ट्रात, प्रामुख्याने कोकणात शिमगोत्सव जसा वैशिष्ट्यपूर्ण असतो, तशीच उत्तर भारतातली होळीही वैशिष्ट्यपूर्ण असते. (Video- कोकणातील खेळे)

उत्तर भारतात होळीच्या वेळी रंग खेळले जातात, तर महाराष्ट्रात धुळवड आणि रंगपंचमीला रंगोत्सव असतो.

उत्तर भारतातली होळीही नक्कीच अनुभवण्यासारखी असते. अशा काही ठिकाणांची थोडक्यात माहिती येथे देत आहोत.

उत्तराखंडमधल्या हृषीकेश येथे अनेक टूर कंपनीज होळीसाठी कॅम्प घेतात. गंगेच्या काठावर शेकोट्या, मित्रांसोबत राफ्टिंग, गुलाल याची मजा औरच.

हृषीकेशमधली होळी म्हणजे परंपरा आणि धाडसी पर्यटन यांचा अनोखा संगम असतो.

हिमाचल प्रदेशातल्या कसौल व्हॅलीमध्ये होळीसाठी Sunburn फेस्टिव्हल असतो. त्याचं ऑनलाइन बुकिंगही करता येतं.

राजस्थानात उदयपूरमध्ये The Divine Hills येथे मुलींना मोफत प्रवेश असतो. तेथे Mud Pool, रेन शॉवर, कलर शॉवर अशा अ‍ॅक्टिव्हिटीज असतात.

राजस्थानच्या Royal Families देखील फेस्टिव्हलसाठी खास सेलिब्रेशन आयोजित करतात.

पुष्कर येथे The Rajasthan Fort मध्ये Grand Event साजरा होतो. जगभरातले पर्यटक तेथे होळीसाठी येतात.

कोरोनामुळे पुष्करमध्ये दोन वर्षं न झालेला उत्सव यंदा मात्र होणार आहे. त्यांमुळे पुष्कर Bucket List मध्ये असायलाच हवं.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?