शिंदे गटाला 'सुप्रीम' दिलासा; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?
एकनाथ शिंदेंना सुप्रीम कोर्टात मोठा दिलासा, पुढची लढाई निवडणूक आयोगाच्या दारात
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या सुनावणीवरची स्थगिती सुप्रीम कोर्टाने हटवली आहे.
आजच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला खरी शिवसेना कुणाची, याबाबतची कार्यवाही सुरू करायला परवानगी दिली आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती दिली जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यासह उद्धव ठाकरे गटाचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.
7 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश दिले होते.
शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यातच शिवसेना कोणाची हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आता निवडणूक आयोगाने यावर लवकर सुनावणी करावी, अशी शिंदे गटाची इच्छा आहे.