कोरोना काळातही अवनियापुरममध्ये रंगली जल्लीकट्टूची धूम!
दर वर्षी पोंगलच्या तिसऱ्या दिवशी तमिळनाडूत जल्लीकट्टूचं आयोजन होतं.
मैदानात उधळलेल्या बैलाला माणसाने काबूत आणायचं, असा हा खेळ असतो.
स्पर्धक ठरलेल्या वेळेत बैलाला काबूत आणू शकेल तो विजयी होतो.
यंदा COVID-19 Protocols पाळून जल्लीकट्टू आयोजनाला परवानगी मिळाली आहे.
या वर्षातला पहिला जल्लीकट्टू इव्हेंट पुदुकोट्टईमध्ये झाला.
मदुराई जिल्ह्यातल्या अवनियापुरममधला जल्लीकट्टूचा सोहळा खास असतो.
अवनियापुरममध्ये 14 जानेवारीला 8 वाजल्यापासून जल्लीकट्टूला सुरुवात झाली आहे..
तीन इव्हेंट्ससाठी 300हून अधिक स्पर्धक आणि सुमारे 5000 बैलांची नोंदणी झाली आहे.
COVID-19मुळे क्षमतेच्या निम्मे आणि जास्तीत जास्त 150 प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे
रिपोर्ट निगेटिव्ह असलेल्यांनाच जल्लीकट्टूसाठी उपस्थित राहता येणार आहे.
मात्र अवनियापुरममध्ये शेकडो नागरिकांनी खेळ पाहण्यासाठी गर्दी केली होती
खेळाच्या ठिकाणी बॅरिकेट्सच्या बाहेरच नव्हे तर घरांच्या छतांवरुन प्रेक्षक हा खेळ पाहत आहेत
जल्लीकट्टू हा ग्रामीण खेळ तमिळनाडूच्या प्राचीन परंपरेशी संबंधित आहे.
त्याचा इतिहास 2500 वर्षं जुना असल्याचं सांगितलं जातं.
इ.स.पू. 400-100 म्हणजेच तमिळ शास्त्रीय कालखंडात या खेळाची सुरुवात झाली
जल्ली हा शब्द सल्ली या तमिळ शब्दावरून आला असून नाणं असा त्याचा अर्थ.
'कट्टू' या शब्दाचा अर्थ होतो 'बांधलेला'.
या खेळाच्या एका प्रकारात बैलाच्या शिंगाला बांधलेलं नाणं काढायचं असतं.
एकूण तीन प्रकारात या खेळाची रंगत असते,
यात विजेत्याला गोल्ड कॉइन्स, कार्स, बाइक्स, वॉशिंग मशीन्स अशी बक्षिसं दिली जाणार आहेत
तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?