भारतातच घेता येईल Bungee Jumping चा आनंद; कोणती आहेत ठिकाणं?

फिरण्याची हौस सर्वांनाच असते. कोणाला समुद्रकिनारी, तर कोणाला हिल स्टेशनला जायला आवडतं. काही जणांना Adventure Activities आवडतात.

भारतात अशा अनेक Tourist Places आहेत, की जिथे Adventure Activities करता येतात. 

इंटरनॅशनल एक्सपर्ट्सच्या देखरेखीखाली Bungee Jumping चा अनुभव देशात अनेक ठिकाणी घेता येतो. त्यापैकी काही ठिकाणांची माहिती घेऊ या.

उत्तराखंडमधलं हृषीकेश हे  वेगवेगळ्या Adventure Activities साठी ओळखलं जाणारं ठिकाण आहे. त्यामध्ये बंजी जम्पिंगचाही समावेश आहे.

हृषीकेशमधल्या मोहनचट्टी गावात 83 मीटर उंचीवर बनवण्यात आलेलं जम्पिंग हाइट्स हे बंजी जम्पिंगसाठी उत्तम ठिकाण मानलं जातं.

महाराष्ट्रात लोणावळा हे निसर्गरम्य ठिकाण बंजी जम्पिंगसाठीही ओळखलं जातं. तिथे अत्यंत सुरक्षित पद्धतीने बंजी जम्पिंग केलं जातं.

लोणावळा ओल्ड हायवेवर कुनेगाव येथे बंजी जम्पिंगसाठी 28 मीटर्स उंचीचं ठिकाण तयार करण्यात आलं आहे.

गोवा बीचसाठी जितका फेमस आहे, तितकाच बंजी जम्पिंगसाठीही. गोव्यात बंजी जम्पिंगची उंची 25 मीटर्स आहे.

गोव्यात अंजुना घाटाजवळ मार्केट रोडवरच्या ग्रॅव्हिटी झोनमध्ये ही सुविधा असून, 400 ते 500 रुपये तिकीट आहे.

बेंगळुरूमधलं ओझोन अ‍ॅडव्हेंचर्स हे बंजी जम्पिंगसाठीच्या फेमस नावांपैकी एक आहे. तिथली उंची 25 मीटर्सपेक्षाही जास्त आहे.

हे ठिकाण बेंगळुरूच्या सेंट मार्क रोडवर असून, तिथलं तिकीट जवळपास 500 रुपये आहे.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?