भाषण आणि संभाषण कौशल्य म्हंटलं की देशातील अनेक व्यक्ती डोळ्यांसमोर येतात.
यामध्ये काही राजकारणी तर काही मोठे पब्लिक स्पिकर्स पण असतात.
भाषण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही अनेकांचे फेव्हरेट आहेत. त्यांची भाषणं ऐकतच राहावी असं अनेकांना वाटतं.
पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांची विविध विषयांवरील भाषणं कोण लिहून देतं माहितीये? जाणून घेऊया.
पंतप्रधानांना राजकारण आणि इतर विषयांवरील भाषणं कोण लिहून देतं यासही PM ऑफिसकडे RTI दाखल करण्यात आली.
या RTI चं उत्तर देताना PM कार्यालयाकडून सांगण्यात आलं की PM मोदीच स्वतःची भाषणं तयार करतात.
विविध मीडिया सोर्सेसकडून माहिती गोळा करून PM स्वतःच भाषणाची रूपरेखा ठरवतात.
अर्थात PM मोदींना यासाठी रिसोर्सेसकडून इनपुट्स मिळतात आणि त्यावर भाषण तयार होतं.
भाषणाला अंतिम रूपरेखा देण्याचं काम PM स्वतः करतात असं RTI मध्ये सांगण्यात आलंय.