देशातील पहिली किन्नर न्यायाधीशची कहाणी
             जोइता मंडल पश्चिम बंगालमधील रहिवासी आहेत.
             कॉलेजमध्ये त्यांची खिल्ली उडवली गेली. 2009मध्ये त्यांनी घरही सोडले.
             जोइता स्वत:ला मुलगी मानायच्या. दुर्गा पुजावर त्यांनी श्रृंगावर केल्यावर त्यांना घरच्या लोकांनी मारहाण केली होती. 
             घर सोडल्यावर त्यांना राहायला कुठे जागा मिळाली नाही. त्यामुळे त्या तृतीयपंथीयांच्या स्थानावर गेल्या. यादरम्यान, त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. 
             2010 मध्ये त्यांनी दिनाजपूरमध्ये तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी संस्था स्थापन केली. 
             त्यांनी वृद्धांसाठी वृद्धाश्रम स्थापन केले. 
             रेड लाइट एरियातील परिवारातील लोकांची मदत, मुलांच्या शिक्षणाची सोय केली.
             8 जुलै 2017 ला राज्य सरकार ने सार्वजनिक न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केले. 
             जिथल्या लोकांनी त्यांची खिल्ली उडवली, तिथूनच त्या आता त्या सफेद रंगाच्या कारमध्ये जातात.