नरकाहूनही वाईट होईल करिअर
या चुका टाळाच 

आजकालच्या काळात जॉब मिळणं अतिशय कठीण झालं आहे. त्यात कंपन्याही त्यांचे कर्मचारी निरखून आणि पारखून घेत आहेत.

जॉब लागल्यानंतर तो जॉब टिकवणं आणि त्या क्षेत्रात सतत प्रगती करत राहणं आपल्या हातात आहे. 

एखाद्या ठिकाणी जॉब लागला की तिथल्या माणसांशी आणि वरिष्ठांशी जुळवून घेणं महत्त्वाचं आहे.

अनेकांना जॉब करताना वागण्या बोलण्यातील काही वाईट सवयी असतात. 

या सवयी जर तुम्हालाही असतील तर तुमचं करिअर धोक्यात येऊ शकतं. इतकंच नाही तर तुम्हाला नोकरी गमवावी लागू शकते.

म्हणूनच या सवयी तुम्हालाही असतील तर आताच सावध व्हा आणि बदल करा.

काही लोक ऑफिशिअल ईमेल पाठवताना SMS ची भाषा वापरतात त्यामुळे तुमचं इम्प्रेशन खराब होतं. 

ऑफिसमध्ये कोणाबद्दल बोलणं किंवा कोणाच्या वैयक्तिक गोष्टी करणं बंद करा.

काही लोक ऑफिसमध्ये टाईमपास या नावानं प्रसिद्ध असतात. त्यामुळे टाईमपास करू नका. 

बॉसला किंवा ऑफिसला नावं ठेवण्यामुळे तुमचा प्रभाव कमी होऊ शकतो. तसंच तुमची नोकरीही जाऊ शकते