'या' भयंकर जागांवर रात्री कधीच जाऊ नका 

आपल्या देशात आणि जगात अशा अनेक जागा आहेत जिथे जाणं म्हणजे प्रचंड भीतीचा अनुभव करणं आहे. 

अशी ठिकाणं ज्या ठिकाणांबद्दल एक ना अनेक कथा आहेत ज्यामुळे लोक जायला घाबरतात. 

बाहुल्यांचे बेट - मेक्सिको: एका कलाकाराने अदृश्य शक्तीला शांत करण्यासाठी 50 वर्षांहून अधिक काळ बाहुल्या लटकवल्या.

प्रिपयत - युक्रेन: इथे 50,000 पेक्षा जास्त लोक राहत होते पण आता नुक्लिअर स्फोटात हे भुताचं शहर झालं आहे. 

आओकीगहारा - जपान: हे जगातील दुसरे सर्वात लोकप्रिय आत्महत्या ठिकाण आणि जपानमधील जंगल आहे. म्हणून भयावह आहे.

द हिल ऑफ क्रॉस - लिथुआनिया: या ठिकाणी क्रॉस सोडण्याची परंपरा आहे. पण इथे रात्री जाणं म्हणजे धोका आहे असं लोकं मानतात. 

मियाकेजिमा - जपान: हवेतील विषारी वायूंमुळे हे एक शहर आहे जिथे प्रत्येकजण गॅस मास्क घालतो. म्हणून इथे जाण्याची कोणी हिम्मत करत नाही. 

दादीपार्क, दादीझेल - बेल्जियम:  एका लहान मुलाने राईडमध्ये हात गमावल्याने ते बंद पडले आणि बंदच आहे. इथे लोक जाण्यास घाबरतात. 

झेस्टोचोवा ट्रेन डेपो - पोलंड: सडलेले रेल्वे स्थानक, सडलेले डबे, गंजलेले रुळ, हे सर्व काही विस्कळीत आहे. इथे गेल्यावर अनेकांना भीती वाटते.     

ही सर्व ठिकाणं आणि त्याच्या कथा या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या गोष्टींवरून घेतल्या आहेत. अंधश्रद्धा पसरविण्याचा आमचा हेतू नाही.