मेजर वीरपत्नी गौरी महाडिक झाल्या पायलट

भारतीय सेनेच्या बिहार रेजिमेंटच्या 7व्या बटालियनचे मेजर प्रसाद महाडिक कर्तव्य बजावताना शहीद झाले होते. 

यानंतर त्यांच्या पत्नी गौरी महाडिक यांनी भारतीय सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला होता. 

यानंतर त्या 2020 मध्ये भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट म्हणून दाखल झाल्या होत्या. 

आता त्यांनी पायलट होण्यासाठीचे प्रशिक्षण पूर्ण केले असून आता त्या भारतीय सैन्यदलात पायलट झाल्या आहेत.

भारत-चीन सीमेवरील ‘आसाम हिल’ येथे टॅन्क तपासणी करताना झालेल्या स्फोटात मेजर प्रसाद महाडिक यांना वीरमरण आले होते. 

गौरी महाडिक यांनी कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये त्यांनी बेसिक रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीमचे यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. 

त्यांना गुरुवारी  दीक्षांत सोहळ्यात ‘आरपीएएएस विंग’ प्रदान करून गौरविण्यात आले. 

मार्च 2020 साली त्या लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्यात दाखल झाल्या. 

आता त्यांनी पायलट होण्यासाठीचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.