असा कमी करा तुमचा बोरिंग Notice Period 

कोणत्याही कंपनीत काम करताना आपल्याला कधी ना कधी ती कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जावंच लागतं. 

मात्र अशावेळी राजीनामा दिल्यानंतर महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे नोटीस पिरेड.

नोटीस पिरेड म्हणजे कंपनीतून राजीनामा दिल्यांनतरचा काही दिवसांचा कामाचा काळ.

तुम्ही सोडून जाण्याआधी कंपनीला तुमची रिप्लेसमेंट मिळावी म्हणून हा काळ असतो. 

अनेक कंपन्यांमध्ये हा काळ एक महिन्याचा तर कुठे तीन महिन्यांचा असतो. प्रत्येकाला नोटीस पिरेड पूर्ण करणं आवश्यकच असतं असं नाही. 

नोटीस पिरेड पूर्ण करायचा नसेल तर तुम्ही कंपनीला तशी रिक्वेस्ट करू शकता किंवा पेआऊट करू शकता. 

तुमच्या सुट्या कमी करून किंवा कंपनीला पैसे देऊन हा काळ कमी केला जाऊ शकतो. 

तसंच तुमच्या नवीन कंपनीला अप्रोच करून नोटीस पिरेड कम्पन्सेशनबद्दल बोलू शकता. 

नोटीस पिरेड पाळणं आवश्यक आहेच मात्र तुमच्यात पात्रता असेल तर तुम्ही हा काळ कमीही करू शकता. 

यासाठी तुम्हाला तुमच्या HR शी नम्रपणे बोलणं आणि आपलं म्हणणं सांगणं आवश्यक असेल.