कधीकाळी होता डिप्रेशनमध्ये..
नक्की कोण आहे IAS चहावाला 

Heading 3

सध्या MBA चायवाला ते B.Tech चायवाल्यांची देशभर चर्चा आहे.

असंच झाशीमध्ये एक नवीन चहाचे दुकान उघडले आहे. IAS चायवाला असे दुकानाचे नाव आहे.

झाशीच्या वीरांगना नगरमध्ये सुरू झालेले हे चहाचे दुकान संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनले आहे.

या दुकानाचे नाव जितके अनोखे आहे, तितकीच त्याची कथाही अनोखी आहे. इथे IAS म्हणजे I Am सचिन.

दोन वर्षांपूर्वी आयटीआय केल्यानंतर तो सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न करत होता, पण कमी उंचीमुळे त्याची निवड होऊ शकली नाही.

यामुळे तो डिप्रेशनमध्ये जाऊ लागला. तो नैराश्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होता.

मित्राच्या सांगण्यावरून त्याने चहाची टपरी सुरु केली आहे. 

सुशासन चहा, शांतता समरसता चहा, विकास चहा, महिला सुरक्षा चहा, भ्रष्टाचार मुक्त चहासह अनेक खास चहा इथे उपलब्ध आहेत.

या चहाच्या दुकानात तरुणांसाठी लुडो, बुद्धीबळ, क्यूब हे सोडवण्यासाठी ठेवण्यात आले आहेत.