यंदा बोर्डाची परीक्षा देताय? आधी हे वाचा

महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि CBSE च्या बोर्डाच्या परीक्षा जवळ येत आहेत. विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. 

आज आम्ही तुम्हाला बोर्डाच्या परीक्षांचा अभ्यास करण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत. जाणून घेऊया. 

बोर्डाच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी तुमची झोपेची आणि उठण्याची दिनचर्या नियमित करा..

बोर्ड परीक्षा 2023 पूर्वी मानसिक तणाव घेऊ नका. आता बोर्डाच्या निकालाचा विचार करणे थांबवलेले बरे होईल. 

तुमच्या तयारीवर विश्वास ठेवा आणि सर्व लक्ष उजळणीवर ठेवा.

एखादा विषय वाचताना कंटाळा आला असेल किंवा तसा वाटत नसेल तर थोडा वेळ ब्रेक घ्या. 

बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी मित्रांशी स्पर्धा करू नका किंवा त्यांच्याशी तुलना करू नका. 

कोणत्याही विषयाची उजळणी सुरू करण्यापूर्वी नेहमी अभ्यासक्रम तपासा. काही वेळा थोड्याशा गोंधळामुळे मुख्य विषय चुकतात.

बोर्डाच्या परीक्षेमुळे जास्त ताण येत असेल तर समुपदेशक किंवा तुमच्या शिक्षकांशी बोला